Monday, May 17, 2010

संभाजीराव भिडे (गुरूजी) ,एक भारदस्त व्यक्तिमत्व ...

संभाजीराव भिडे (गुरूजी) ,

एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खा महाराष्ट्र ज्यांना ''गुरूजी'' या नावानी ओळखतो.
एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो " शिवप्रतीष्ठान ".
त्या गुरुवर्य भिडे गुरुजीना आमचा शतश: प्रणाम......................!!

आदरणीय श्री. संभाजीराव भिड़े (गुरुजीं) चे विचार ...आणि त्यांची खरी ओळख


ज्यांना खुप बुद्धीमत्ता पण त्यांना फार पैसा नाही, कसं तरी या महीन्याची शेवट पुढच्या महीन्याची सुरुवात, आहे आपलं जगताहेत. ज्यांच्यापाशी खुप काही पैसा आहे पण त्यांना कवडी इतकी अक्कल नाही, मग निश्चितच जिल्हा परिषद वगैरेच तिकिट त्यांनाच मिळतं. आणि ज्यांच्यापाशी बुद्धिमत्ताही खुप आणि पैसाही खुप त्यांना आयुष्य फार नाही, बातमी काही दिवसांपुर्वी आली " कोल्हापुरला महाद्वार रोडवरती जेसीबी मशीनचा धक्का लागुन ते पालथे पडले अंगावरून चाक गेलं, संपलं. भगवंत सगळ्यात पाचार मारतो.
असाच वर्णन हिंदू माणसाच्या स्वभावाचं करता येईल.

शिवछ्त्रपतीँच्याकाळी इस्लामच्या सत्ता होत्या , आज त्या सत्ता पाकीस्तान, बांगलादेशच्या रुपाने जिवंत आहेत, मुघलशाही जिवंत आहे. त्यावेळी त्यांचा हातात अणुबॉम्ब नव्हता आज अण्वस्त्र आहेत. त्याकाळात त्यांच्या पाठीमागे जगातल्या सत्ता नव्हत्या एकशे एक टक्के सगळ्या सत्ता आज त्यांच्या पाठीमागे आहेत, आपल्या विरोधात आहेत. हिंदूंना मेंदू असतात पण अक्कल नसते, हिंदूंना डोळे असतात पण दृष्टी नसते, हिंदूंना हात असतात, भावाचे गळे दाबण्यासाठी असतात ते तलवार घेऊन शत्रूची मान उडवण्यासाठी नसतात. हिंदूंना फुफ्फुस असतात पण ह्रदय शून्य कारण भावना कोणाचीच देशा देवा धर्माची नाही. . हे बदलायचं असेल तर एकचं आदर्श, एकचं मार्ग, एकचं महापुरुष 'शिवाजी संभाजी' ही परंपरा ज्यांच्या रक्तात भिनालेली आहे असे तरूण उत्पन्न केले पाहीजे.

एकच महापुरुष की जो हिन्दुस्थान नावाचे गणित टिकवण्यासाठी उपयोगी पडेल सर्वश्रेष्ठ शिवछत्रपतींची परंपरा हाच मार्ग आहे. दूसरा मार्ग नाही.

जगावे मातृभूसाठी,
झिजावे मातृभूसाठी,
जळावे मातृभूसाठी,
मरावे मातृभूसाठी,
आम्हाला वेड हे एक ||

राष्ट्र म्हणून जगण्यासाठी लागणारी ताकद मिळवण्यासाठी अनेक कार्यक्रम, उपक्रम राबवणे गरजेचे आहेत. यासाठी शिवप्रतिष्ठानतर्फे दरवर्षी शिवछ्त्रपतींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ३७८ गडकोट पैकी ३-४ गडकोट किल्ल्यांचे दर्शन घ्यायला जातो. लक्षात ठेवा जेव्हा आई संकटाच्या काळात पोराला आपल्या कुशीत घेते आणि कोणत्याही संकटापासून त्याला वाचवते. साध्या कोंबडीचाही तो धर्म आहे, एखादी घार गिधाड झड़प घालून आली तर पिले आपल्या पंखाखाली घेते, आणि वाचवते. शिवछ्त्रपतींच्या संकट काळात या गडकोट किल्ल्यांनी कायमच शिवछ्त्रपतींना आपल्या कुशीत घेऊन वाचवले आहे. जिजामातेनी जन्म दिला, लहानाचं मोठ केलं, सगळं काही शिकवलं. शिवछ्त्रपतींच्यात जी आग आहे ती फार मोठ्याप्रमाणात जिजामातेपासून आलेली आहे. जिजामातेनी जन्म दिला असेल पण संकट काळात महाराजांना वाचवलेल्या या दुर्गरूप आया आहेत अशी आमची श्रद्धा आहे. हे सगळे किल्ले जिजामातेचचं काम केलेले आहेत. जिजामाता निघून गेली पण ती या दुर्गरूपाने जिवंत आहे असं आमचं म्हणणं आहे. त्या त्यांच्या आईच्या दर्शनासाठी आम्ही जातो. ते गडकोट किल्ले म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या ऐन तरण्याताठ वयात सुखाच्या संसारावरती निखारा ठेवून, बिल्वपत्र, तुळशीपत्र ठेवून, सुखाचा संसार सोडून देवून...........

शिवछ्त्रपतींच्या शब्दाखातर आया बहिणींनी आपलं कुंकू ही गमावलं, नवरा ही गमावला. आणि त्या नवय्रापासून झालेलं पोरं वयात आल्यानंतर "तुझा बाप ज्या कामासाठी गेला त्याचं कार्यासाठी शिवछ्त्रपतींच्या कार्यासाठी तू निघून जा ". नवरा गेला कुंकू गेलं, सौभाग्य गेलं. पोरगा गेला, अरे वंशाचा अंकुर खुडाला गेला, निर्वंश झाला. असली आयाबहीणींची पुरुषांची जात या देशात केवळ महाराजांनी उत्पन्न केली.

अशा लोकांच्या, स्वातंत्र्यवीरांच्या, धर्मवीरांच्या,देशभक्तांच्या रक्तात, बलिदान केलेल्यांचा रक्तात भिजलेले ते सगळे परीसर आहेत. त्या परिसरात त्यांच्या रक्तामुळे एक ताकद आलेली आहे. महाराष्ट्रातील या गडकोट किल्ल्यांवर अनेक नरवीरांच्या, शूरवीरांच्या रक्तात नाहलेली माती आहे. ती तुमच्या आमच्या देहाला लागली, तुम्ही आम्ही जिभेवर टाकून ती गिळली, तर एकशे एक टक्के संतांच्या मार्गाने गेलं तर आत्मोन्नती, आत्मोद्धार, आत्मसाक्षात्कार होऊन भगवंताची प्राप्ती होते तसे या रणवीरांच्या रक्तात नाहलेले मातीचे कण तिथल्या परीसरातील धूळ देहाला लागली तर राष्ट्रोन्नती, राष्ट्रोद्धार, राष्ट्रसाक्षात्कार होऊन मायभूमीचे ऋण फेडण्याची शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या सारखी ताकद हरएकाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि आज देशाला त्याची आवश्यकता आहे.
आजचं नाही तर कित्येक वर्षापासून ही मायभूमी देशभक्तीच्याबाबतीत कंगाल, भिकार मायभूमी आहे. तिला शिवछत्रपतींच्या वृत्तीची, कृतीची, अंतःकराणाची, प्रवृत्तीची, मनस्थितीची बनवण्यासाठी तोच एक मार्ग आहे म्हणून आम्ही गडकोट किल्ल्यांवर जातो, तिथे राहतो. अरे ! पोटाची विद्या शिकवण्यासाठी आपली विद्यापीठे शेकडो प्रकारचे कोर्सेस काढून शिकवतं आहेत ते सगळं आवश्यक आहे. फार्मसी, लॉ, मेडीकल, इंजिनियरींग, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आशा आणखीन काही शंभर प्रकार हे सगळं काही योग्य आहे. पण शिवछ्त्रपतीची जी हिन्दवी स्वराज्याची विद्या ते शिकवणं कुठल्याचं विद्यापीठात अगदी शिवाजी विद्यापीठाही कोणी करत नाही. प्रत्येक घरातं जन्मलेली पोरं ती विद्या शिकलेले स्नातक बनले पाहीजेत. आणि या प्रत्येक गडकोटाच्या कुशीत एक एक विद्यापीठ आहे पहा. त्या विद्यापीठात 'शिवाजी विद्या' शिक्षणाची सोय आहे, तेथे ही शिवाजी विद्या ग्रहण करण्यासाठी जातो म्हणजे मायभूमीचे पांग फेडणारी पिढी उत्पन्न होईल



या मोहीमा करतो ते या सगळ्या हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेल्या मातीच्या कणाकणांत हे हुतात्मे आम्हाला दिसतात अशी श्रद्धा आहे आमची. त्या गडकोट किल्ल्यांच्या तटा बुरुजात, आरश्यात प्रतिबिंब दिसावं त्याप्रमाणे ते दिसतात त्यांना आम्ही मागायला जातो. काय मागायला जातो ? तुकोबाराय म्हणतात की देव, भक्त आणि नाम या तिन्हीचा संगम आमच्या शरीरात दे त्याप्रमाणे "शिवछत्रपती, संभाजी महाराज, येसाजी कंक, बाजी पासलकर, संताजी घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहीते, तानाजी मालुसरे, जीवा महाला अशा असंख्य हुतात्म्यांजवळ मी जावून मागतो. काय ? की तुमच्या सारखाच आमच्या देहात हां त्रिवेणी संगम घडूदे राष्ट्रोन्नती राष्ट्रोद्धार राष्ट्रसाक्षात्कारासाठी.


शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज- जगण्या मरण्याचे दोन विलक्षण आदर्श ज्या मायभूमीच्या पोटी जन्माला आले 'ती मायभूमी आणि हे दोन आदर्श' हे माझ्या ह्रदयाच्या देव्हाय्रात सिंहासनावरती त्यांचा वास असावा. या तिघांचा माझ्या ह्रदयात निरंतर वास, या तिघांच्या पायाच्या मी अनन्य दास, आणि या तिघांच्या नामाचा मुखावाटे अखंड ध्यास असा माझ्या देहात त्रिवेणी संगम घडावा की जेणे करून ह्यांच्याच सारखा मायभूमीचे पांग फेडण्यारा एक सुपुत्र म्हणून जगण्याचे भाग्य मला लाभेल". यासाठी या मोहीमा असतात.

पण ही वेळ का आली ? ही वेळ गांधीजी, पंडितजी पत्काराल्याने आली.
गांधीजी, पंडितजी का पत्करावे लागले ? ते महाराष्ट्राने केलेल्या पाच देशद्रोहामुळे.
मोठा देशद्रोह - ज्या महाराष्ट्राने पाचही पातशाह्या आणि वरची मुघलशाही मातीत घातली आणि १७८८ ते १८०३ या देशावरती एकतर्फी असेतु हिमाचल हिन्दवी स्वराज्याचं राज्य उत्पन्न केलं त्या मराठयानी शेण खाल्लं देशद्रोहाचं.
त्यांनी काय केलं ?
४ ऑगस्ट १७६८. इंग्लंड फार कावेबाज इंग्रज फार धूर्त, आम्ही फार नादान.
लॉर्ड क्लाईव्ह बंगालचा गव्हर्नर होता. त्यांने एक पात्र धाडलं इंग्लंडच्या राजाला की, " कृपा करून आपण आजपर्यंत गहू, तांदूळ, ढाक्क्याची मलमल, मसाल्याचे पदार्थ, वेलदोडे, मिरची, दालचीनी, लवंग हे विकून आपण पैसे मिळवतोय. हां धंदा बंद करुया आपण. चालु ठेवू वाटलं तर. पण मला तुम्ही एक परवानगी दया. मी इथे राज्य स्थापन करतो. आपली राजवट उत्पन्न करतो"

त्या पत्राचं उत्तर आलं की,
" तू नोकर आहेस आणि नोकराने मालकाला कधी न विचारता अज्ञान शिकवायचं नाही. गप्प बसं. पुन्हा असं पत्र धाडू नको उपदेशाचं ".

त्याचं पुन्हा पत्र गेलं की,
" मी मर्यादा ओलांडतोय पण हे देशाच्या हिताचं आहे इंग्लंडच्या भल्याचं आहे. डच, फ्रेंच, पोर्तुगीज आपली राज्य स्थापन करायला लागली आहेत. ते स्पर्धक आहेत, ते जर स्पर्धेत यशस्वी झाले तर आपला व्यापार सुद्धा इथे चालणार नाही. आपण राज्य उत्पन्न केलं पाहीजे. मला प्रत्यक्ष मृत्युदंडाची शिक्षा दिली तरी चालेलं. पण देशाच्या हिताचं बोलतोय मला परवानगी दया ".

त्या पत्राचं उत्तर आलं राजाचं की, " तुला किती तोफा, किती बंदूका, किती आरमार, किती लष्कर आणि किती दारूगोळा धाडू ते कळवं".

याने उत्तर कळवलं की, " याच्या मधील काहीही नको. फ़क्त पैसा खर्च करण्याची परवानगी दया"

त्याला उत्तर आलं की, "तुझे डोकं फिरले आहे, मुर्ख आहेस. ६०००-६५०० मैलावारती दूर राज्य स्थापन करायचं तर देशाशी एकनिष्ठ असणारी सेना पाहीजे. तेव्हा किती सेना धाडू ते कळवं"

त्या पत्राचं उत्तर क्लाईव्हने धाडलं की, " गोय्रा इंग्रजांची तरण्याताठ वयाची पोरं मातीत घालून राज्य स्थापन करण्याची आवश्यकता नाही. केवळ पैसा खर्च करण्याची परवानगी दया. इथे वाट्टेल तेवढी माणसं पैशाने विकतं मिळतात. मी त्यांची सेना उभी करतो आणि राज्य कमावतो."

त्याचं उत्तर आलं' " That`s all. Go ahead. पाहीजे तितका पैसा खर्च करं. कामाला लाग. "


गांधीजी पंडितजी कितीही मोठे असोतं पण जर देशाला टिकायचं असेल तर गांधीजी पंडीतजी हे मंत्र टाकून देऊन गोवा ते गोंदिया, कोल्हापूर ते डांग शिवाजी संभाजी रक्तगटाचा महाराष्ट्र उभा केला पाहिजे. तो महाराष्ट्र उभा करून हिन्दुस्थानाचा उध्वस्त होत चाललेला उकिरडा, वाटोळ होत चाललेला संसार तारण्याचं काम ज्यानी चुक केली त्या महाराष्ट्राने केलं पाहीजे. ते काम करण्यासाठी आपण धडपडलं पाहीजे. सगळे पक्ष आपले आहेत, सगळे पंथ आपले आहेत, सगळे सांप्रदाय आपले आहेत, सगळ्या जाती आपल्या आहेत,सगळे नेते आपले आहेत, सगळे आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. सगळयांना घेऊन हां हिन्दुस्थान मोठा करण्याचं काम महाराष्ट्राने केले पाहीजे.

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले |
मराठ्याविना राष्ट्र गाडा चाले |

आत्तासुद्धा सबंध देशाकडे आपण दृष्टी टाकू. अरे ! कुठल्याही प्रांतापेक्षा कुठल्याही क्षेत्रात विलक्षण ताकद असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हिन्दुस्थानचं काळीज आहे. महाराष्ट्र हिंदुस्थानचा प्राण आहे. महाराष्ट्र हिन्दुस्थानचं ह्रदय आहे. महाराष्ट्र हिंदुस्थानचा आत्मा आहे. आणि तोच नादान झालाय तो दुरुस्त केला पाहीजे. आणि तो दुरुस्त करायचा असेल तर शिवाजी संभाजी हे मंत्रच घेऊन उठलं पाहीजे.

No comments:

Post a Comment